'खड्डेमुक्त' मुंबई एका रात्रीत शक्य नाही; 'बाल' ठाकरेंचं विधान

'खड्डेमुक्त मुंबई एका रात्रीत शक्य नाही' असं विधान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलंय. 

Updated: Jun 27, 2015, 11:40 AM IST
'खड्डेमुक्त' मुंबई एका रात्रीत शक्य नाही; 'बाल' ठाकरेंचं विधान title=

मुंबई : 'खड्डेमुक्त मुंबई एका रात्रीत शक्य नाही' असं विधान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलंय. 

मुंबईत ८४२ नवे रस्ते बांधले आणि ५२ जंक्शन्स... त्यावर खड्डे नाहीत असाही दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय. मुंबईत होत असलेल्या रस्त्यांची माहिती एका नव्या वेबसाईटद्वारे देणार असून पावसाळा संपल्यावर नव्या रस्त्यांची कामं हाती घेणार असल्याचंही ठाकरे म्हणतायत.

नालेसफाईची चौकशी करायची असल्यास संपूर्ण देशातल्या नालेसफाईची करा, असं आव्हानही त्यांनी दिलंय. 

जगातलं कोणतंच शहर ३०० मिमी झालेला पाऊस साफ करू शकत नाही अशीही पुश्ती त्यांनी यावेळी जोडलीय. पूर्वी २ - ३ दिवस पाणी साचत होतं ते आता २ - ३ तासांवर आलंय असंही ते म्हणालेत. 
 
यावेळी, नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायलाही ते विसरले नाहीत. नागरिकांनी कचरा नाल्यात फेकू नये असं आवाहनही त्यांनी केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.