मुंबई : आधी सर्व डाळींच्या साठ्यांवर निर्बंध घातले. मात्र, तेलबियाचे भाव हे वाढलेले नाहीत. साठ्यांवर निर्बंध घातल्याने या तेलबियांचे भाव वाढण्याची भिती असल्याने आता तेलबियाच्या साठ्यावर निर्बंध उठण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
आतापर्यंत राज्यात विविध डाळी साठ्यांच्या छाप्यात ६७ हजार मेट्रिक टन साठा सील केला आहे. ४१२२ पेक्षा जास्त किरकोळ , घाऊक व्यापारांवर छापे टाकले आहेत. या डाळी साठ्याची वैधता तपासून त्याचा लिलाव करण्याची प्रक्रियेला २-३ महीने लागतात. ती प्रक्रिया ७ दिवसात कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.
डाळीच्या किमती वाढल्या म्हणून सरकारने साठ्यावर निर्बंध घातले, आता धाडी घालून डाळ पकडली. पण ती डाळ बाजारात कशी आणायची यावर सरकारने अभ्यास केला नाही. त्यामुळे आता ही डाळ बाजारात कशी आणायची याबाबत सरकार विचार करत आहे. व्यापाऱ्यांनी त्यांच्या मार्गाने डाळ लवकर बाजारात आणण्यासाठी सरकार आता टाकलेले निर्बंध पुन्हा उठवण्याचा विचार करत आहे. मात्र, निर्णय तर काही घेतलेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.