मुंबई : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी आता एक नविनच उपाय शोधून काढालाय. एका खासगी संस्थेच्या मदतीनं प्रत्येक बारच्या बाहेर अल्को बुथ लावून ग्राहकानं किती दारू सेवन केलीय याचा शोध लागणार आहे.
तुम्ही किती दारू प्यायलात हे तपासण्यासाठी अल्को बुथमध्ये असणाऱ्या यंत्रणाला फक्त १० सेकंद लागतात. त्यामुळे तुम्ही गाडी चालवण्यायोग्य स्थितीत आहात का याचही माहिती याच बुथमध्ये लगेच दाखवली जाते.
रक्तात ३० मिलीग्रॅम ते १०० मिलीग्रॅमपर्यंत अल्कोहोल आढळलं आणि तुम्ही गाडी चालवत असाल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवण्याआधीच लोक पकडले जातील, असा पोलिसांना विश्वास आहे.