गणेश विसर्जन मिरवणुकीत ऋषी कपूरची पत्रकाराला मारहाण

 आरके स्टिडिओच्या गणपती विसर्जनादरम्यान अभिनेता ऋषी कपूर यांनी पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

Updated: Sep 15, 2016, 10:16 PM IST
गणेश विसर्जन मिरवणुकीत ऋषी कपूरची पत्रकाराला मारहाण title=

मुंबई : आज सर्वत्र विसर्जन सुरु असताना मुंबईत मारहणाची घटना घडली, तिही सेलिब्रिटीकडून. आरके स्टिडिओच्या गणपती विसर्जनादरम्यान अभिनेता ऋषी कपूर यांनी पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणी ऋषी कपूरने माफी मागितल्याचे सांगण्यात येत आहे.

गणपती विसर्जनादरम्यान ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. काही जण सेल्फी घेण्यासाठी पुढे झाले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.
 
ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांनी पत्रकाराला मारहाण का केली यासंदर्भात अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही.