येत्या 24 तासात जोरदार पाऊस होईल : हवामान खाते

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी चांगलाच पाऊस झाला. दरम्यान, येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Updated: Sep 15, 2016, 07:46 PM IST
येत्या 24 तासात जोरदार पाऊस होईल : हवामान खाते title=
संग्रहित छाया

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी चांगलाच पाऊस झाला. दरम्यान, येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

आज सकाळी ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, बोरिवली, पुणे, नाशिक, लातूर, औरंगाबादमध्ये पावसाने हजेरी लावली. बाप्पाचे विसर्जन आणि पाऊस यामुळे भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, कोकण-गोवा पट्ट्यात पुढील 24 तासात चांगला पाऊस पडेल. महाराष्ट्रात 17, 18, 19 सप्टेंबरला मुसळधार पाऊस तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आलाय.