मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही गिरणी कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा

गिरणी कामगारांच्या घरांसाठी दत्ता इस्वलकर आझाद मैदानात मोर्चा काढणार आहेत. गिरणी कामगारांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Updated: Jul 15, 2015, 09:35 AM IST
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही गिरणी कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा title=

मुंबई: गिरणी कामगारांच्या घरांसाठी दत्ता इस्वलकर आझाद मैदानात मोर्चा काढणार आहेत. गिरणी कामगारांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यावेळी येत्या डिसेंबरपर्यंत गिरणी कामागारांना १० हजार घरं देण्याचं आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिलं. शिवाय उरलेल्या ६ गिरण्यांच्या जागांवरही म्हाडा आणि एमएमआरडीला निर्देश देऊन कामं सुरू करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. 

शिवाय सभागृहातही येत्या गुरूवारी याविषयी सविस्तर माहिती देण्याची हमी यावेळी देण्यात आलीय. मात्र सरकारकडून कोणतंही लेखी आश्वासन मिळालं नसल्यानं गिरणी कामगार नियोजित मोर्चाबाबत ठाम आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.