राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्येही हलचल...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाचे संकेत मिळत असून याबाबत शिवाजीराव मोघे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्लीत सोनिया गांधींशी चर्चा केलीय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 7, 2013, 11:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसमध्येही फेरबदलाचे संकेत वाहू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाचे संकेत मिळत असून याबाबत आज शिवाजीराव मोघे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्लीत सोनिया गांधींशी चर्चा केलीय. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या म्हणजेच शनिवारी दिल्लीत सोनिया गांधींशी याबाबत भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. येत्या चार दिवसात मंत्रिंडळता फेरबदल करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसमध्येही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलण्याची जोरदार चर्चा आता सुरू झालीय. तसंच राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळ फेरबदलात काँग्रेसमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या कोट्यात काही जागा रिक्त आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार होण्याचीही शक्यता आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.