www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी करपू नये म्हणून भाकरी फिरविण्याचा निर्णय घेतला. परंतु भाकरी फिरवतांना ज्या मंत्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलीन झाली अशा कलंकित मंत्र्यांना डच्चू देण्याचे धारिष्ठ्य पवार दाखवतील का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात केली जात आहे.
अजित पवार – सिंचन घोटाळ्यामुळे तडकाफडकी राजीनामा देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीतील सर्वात मोठे नेते. परंतु, राजीनामा देऊन पुन्हा ते उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहे. १७ कोटीं हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्यावर आहे.
छगन भुजबळ - महाराष्ट्रा चे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात सार्वजनिक बांधकाममंत्री भुजबळांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
सुनील तटकरे - सुनिल तटकरे यांनी आपले कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांच्या नावावर कंपन्या स्थापन करून जमिनी हडप करीत सुमारे २० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
जयदत्त क्षीरसागर - राज्यात टोल नाक्यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा झाला असून जयदत्त क्षीरसागर आणि छगन भुजबळ हे मंत्री त्यास जबाबदार असल्याचा घाणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला होता.
विजयकुमार गावित - समाजापासून वंचित असलेल्या आदिवासी समाजाच्या विकास योजनेत डल्ला मारला आहे. आदिवासी विकास विभागात तब्बल 3,000 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप आता होतं आहे. वस्तूंच्या किमती फुगवून कोट्यवधी रुपये लाटल्यांत आले आहे. या प्रकरणामुळे तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित अडचणीत आले आहे.
गुलाबराव देवकर - २१ मे २०१२ शहरातील सुमारे २९ कोटी रुपयांच्या घरकुल योजनेच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्याचे परिवहन राज्यमंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव देवकरयांना आज सकाळी साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.