मुंबई : आठवड्यभराच्या अमेरिका दौऱ्यावरून परतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. २९ जुलैला अमेरिका दौऱ्यावर जाताना एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या विलंबाबद्दल मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशीं पासपोर्ट आणि व्हिसाची महत्वाची कागदपत्र घरी विसरल्यानं एअर इंडियाचं नेवार्कला जाणारं विमान २९जुलैला दीड तास खोळंबलं होतं. विमान थांबवण्यासाठी कुठलंही शिफारस केली नव्हती, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
पण एअर इडियाच्या फ्लाईट ऑफिसरनं विलंबाबद्दल दिलेल्या स्पष्टीकरणात मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळतील एका महत्वाच्या अधिकाऱ्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या फडणवीसांच्या स्वीय सचिवांवर कारवाई काय कारवाई होणार, असा प्रश्न सध्या विचारला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.