मुंबई : आठवड्याभराचा अमेरिका दौरा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत परतले. मेक इन महाराष्ट्र उपक्रमांअंतर्गत राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याच्या उद्देशानं या दौऱ्यावर अनेक बड्या जागतिक उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले.
या दौऱ्यनंतर राज्यात किमान साडे चार हजार कोटींची गुंतवणूक आणि ५ हजार नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील, असा सरकारचा दावा होता. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, आणि राज्यातल्या प्रमुख सनदी अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळही अमेरिकतून परत आलंय.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव प्रवीण परदेशी यांच्या धांदरटपणामुळे मुख्यमंत्र्यांसह एअर इंडियाच्या विमानाला २९ जुलैला जवळपास दीड तासाचा उशिर झाला होता. याप्रकरणी व्हीहीआयपींना मिळणाऱ्या सवलतींवरून देशभरात चर्चेांना उधाण आलं होतं. याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयानं अहवालही मागवलाय. त्यामुळे मुख्यमंत्री आता त्याविषयी का स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे,.
राज्यात किती आणि कोठे होणार गुंतवणूक ?
- ब्लॅकस्टोन उद्योगसमूहान राज्यात ४५०० कोटी रुपयांची घसघशीत गुंतवणूक करणार आहे. यामध्येहिंजेवाडी(पुणे) येथे १२०० कोटी, मध्य मुंबईतील आयटी पार्कमध्ये १५०० कोटी, मुंबईतील इतर आयटीपार्कमध्ये १०५० कोटी आणि ईऑन फ्री झोन सेझमध्ये ७५० कोटी एवढी गुंतवणूक होणार
- कोकाकोला कंपनीने महाराष्ट्रातील लोटे परशुराम (चिपळूणजवळ, जि. रत्नागिरी) येथे ५० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार
- सिटी बँक मुंबई आणि पुण्यात आपला कार्यविस्तार करणार असून नव्याने ४ हजार रोजगार निर्माण होणार
- नागपूर शहर अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि सिस्को यांच्यात एका महत्त्वपूर्ण करारावर
- क्रिसलर समुहाने महाराष्ट्रातील आपले उत्पादन दुपटीने वाढविण्यात येईल असे जाहीर केले
- मायक्रोसॉफ्ट समुहाने राज्यात एक स्मार्ट औद्योगिक वसाहत तसेच पुणे येथे सायबर सुरक्षा केंद्र उभारण्याचे जाहीर केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.