मुंबई: रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाताय... सावधान... कारण मुंबईत या खाद्यपदार्थांच्या 30 स्टॉल्सच्या पाण्यात ई-कोलाय हा घातक संसर्गजन्य विषाणू आढळलाय.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया वेगानं फोफावत असल्यानं पालिका आयुक्त अजय मेहता यांनी रस्ते आणि फूटपाथवर उघड्यावर विक्री करण्यात येणाऱ्या गाड्या आणि स्टॉल्सवर कारवाईचे आदेश दिलेत. त्यानुसार ३७ स्टॉल्सवरील पाण्याच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी केली असता ३० स्टॉल्सवरील पाण्यात ई-कोलाय हा विषाणू आढळलाय.
या विषाणूमुळं पोटाचे विकार होतात. त्यामुळं प्रशासनानं आतापर्यंत 13 स्टॉल्सचा परवाना रद्द केलाय. स्टॉल्सधारकांनी कोर्टात धाव घेतली असता या कारवाईवर कोर्टानं स्थगिती आणलीय. पिण्यासाठी शुद्ध पाणी, खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी इतर कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची माहिती देणारे फलक स्टॉल्सवर लावण्याच्या अटींवर ही स्थगिती देण्यात आलीय.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.