आलोकनाथ यांचा मुलगा शिवांगला ड्रंक अँड ड्राईव्हविरोधी मोहिमेअंतर्गत पकडले

 बॉलीवूडचे संस्कारी बाबूजी प्रसिद्ध आलोकनाथ त्यांच्या स्वतःच्या मुलावर संस्कार करायला विसलेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी आलोकनाथ यांचा मुलगा शिवांग नाथ याला ड्रंक अँड ड्राईव्हविरोधी मोहिमेअंतर्गत पकडण्यात आले आहे

Updated: Oct 4, 2016, 08:41 AM IST
आलोकनाथ यांचा मुलगा शिवांगला ड्रंक अँड ड्राईव्हविरोधी मोहिमेअंतर्गत पकडले title=
संग्रहित छाया

मुंबई : बॉलीवूडचे संस्कारी बाबूजी प्रसिद्ध आलोकनाथ त्यांच्या स्वतःच्या मुलावर संस्कार करायला विसलेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी आलोकनाथ यांचा मुलगा शिवांग नाथ याला ड्रंक अँड ड्राईव्हविरोधी मोहिमेअंतर्गत पकडण्यात आले आहे

शिवांग त्याच्या एका मैत्रिणीच्या बर्थ डे पार्टीला गेला होता. पार्टीहून परत येताना खास पोलिसांनी त्याची गाडी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहिमेअंतर्गत  थांबवली. पण गाडी थांबवण्याऐवजी शिवांगनं गाडी पुढे दामटली. ट्रॅफिक पोलिसांनी त्याला सांताक्रुझमध्ये पकडले.

यादरम्यान शिवांगच्या काही मित्रांनी जोरदार हुज्जत घातली. त्यातील हसन नावाचा तरुण दारूच्या नशेत होता. शिवाय त्यानं पोलिसांवर हात उचलल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी शिवांगची गाडी जप्त केलीय. शिवाय त्याला 2600 रुपयांचा दंडही करण्यात आलाय. आज सकाळी शिवांग आणि त्याच्या मित्रांना बांद्रा कोर्टात हजर करण्यात येणार आहेत.