अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द, महायुतीच्या चर्चेची गती ठप्प

महायुती महासंकटात सापडली आहे. महायुती तुटणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झालाय. 

Updated: Sep 25, 2014, 01:18 PM IST
अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द, महायुतीच्या चर्चेची गती ठप्प title=

मुंबई : महायुती महासंकटात सापडली आहे. महायुती तुटणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झालाय. 

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये एका कार्यक्रमासाठी शहा येणार होते. मुंबई भेटीत शहा महायुतीच्या चर्चेला गती देतील अशी शक्यता होती. पण आता शहा यांचा दौराच रद्द झाला आहे. त्यामुळं ठप्प झालेली चर्चा पुढे कशी सरकारणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आज तुळजापूरला रवाना झालेत. आज घटस्थापना असल्यानं तुळजाभवानीचं दर्शन घेऊन शिवसेना प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे. 

शहा येणार नसल्यानं आणि उद्धव मुंबईबाहेर असल्यामुळे महायुतीच्या जागावाटपाबाबत आज काही घडण्याची शक्यता नसल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.