अंजली दमानिया गडकरींविरोधात निवडणूक लढवणार नाहीत

आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया या नितीन गडकरी विरुद्ध नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.

Updated: Jan 9, 2014, 01:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया या नितीन गडकरींविरोधात नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
अंजली दमानिया यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर ही अफवा असल्याचं समजतंय. यावर स्पष्टीकरण देतांना अंजली दमानिया म्हणाल्या, आपल्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे, यामुळे आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं अंजली दमानिया यांनी स्पष्ट केल आहे.
तर दुसरीकडे सिंचन घोटाळा बाहेर काढणारे, सेवा निवृत्त अभियंता विजय पांढरे यांनी नाशिकमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर शासनच भ्रष्ट असल्याचं विजय पांढरे यांनी म्हटलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.