अशोक चव्हाणांवर कारवाईसाठी तावडेचे राज्यपालांना पत्र

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत फेरविचार करण्याची केली मागणी. आदर्श घोटाळा प्रकरणी सी बी आय ने दाखल केलेल्या अहवालात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोषी आढळले आहेत. हीच बाब आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील भ्रष्टचारची चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने देखील अहवालात QUID PRO QUO असा शब्दोउल्लेख करीत नमूद केली आहे. असे असताना अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास परवानगी न दिल्यास पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षा भंग होईल.

Updated: Dec 24, 2013, 05:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत फेरविचार करण्याची केली मागणी. आदर्श घोटाळा प्रकरणी सी बी आय ने दाखल केलेल्या अहवालात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोषी आढळले आहेत. हीच बाब आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील भ्रष्टचारची चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने देखील अहवालात QUID PRO QUO असा शब्दोउल्लेख करीत नमूद केली आहे. असे असताना अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास परवानगी न दिल्यास पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षा भंग होईल.
महाराष्ट्राच्या पुरोगामितात्वाचा वारसाजपण्याच्या अनुषंगाने अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सी बी आय ने जी परवानगी मागीतली आहे, त्यावर आपण फेरविचार करावा आणि अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध यांच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी आज राज्यपालांन शंकर नारायण यांना पत्र पाठवून केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.