'ड्रग्ज' झाले 'अजिनोमोटो'; बेबी पाटणकरला जामीन

२२ कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्स प्रकरणात मुंबई क्राईम ब्रान्चला जोरदार झटका बसलाय. हे प्रकरण आता मुंबई क्राईम ब्राचंच्या हातून जवळपास निसटल्यात जमा आहे... कारण या प्रकरणातील प्रमुख आरोपी बेबी पाटणकर हिला जामीन मंजूर करण्यात आलाय. 

Updated: Jul 16, 2015, 04:05 PM IST
'ड्रग्ज' झाले 'अजिनोमोटो'; बेबी पाटणकरला जामीन title=

मुंबई : २२ कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्स प्रकरणात मुंबई क्राईम ब्रान्चला जोरदार झटका बसलाय. हे प्रकरण आता मुंबई क्राईम ब्राचंच्या हातून जवळपास निसटल्यात जमा आहे... कारण या प्रकरणातील प्रमुख आरोपी बेबी पाटणकर हिला जामीन मंजूर करण्यात आलाय. 

बेबी पाटणकर हिला मुंबई सत्र न्यायालयाने ५ लाख रुपयांच्या व्यक्तिगत जात मुचलक्यावर जामिन दिलाय. या प्रकरणातील हा अकरावा जामीन आहे.

या प्रकणात १२२ किलो अंमली पदार्थ हे 'अजिनोमोटो' असल्याचे एफएसएल रिपोर्टमध्ये आले आणि अचानक या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली.

या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रान्चच्या मोठ्या अधिकारी आणि अनेक पोलीसांची नावे असल्याने हे प्रकरण संपवलं जातंय, अशी चर्चा सुरू आहे. 

याआधी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी बेबीला मदत केल्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या सर्व पोलीसांना न्यायालायने जामिन दिलाय. त्यामुळे लवकरच मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचा कॉनस्टेबल धर्मराज काळोखेलाही जामिन मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.