मुंबई: पश्चिम रेल्वेवर प्रवास करताना तुम्हाला विरार-बोरिवलीकरांचा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो, आता तो आणखी तीव्र आणि वाढत चालला आहे. डब्यात जास्त गर्दी होईल म्हणून लोकलचा दरवाजाच बंद करण्याचा प्रकार आज विरारमध्ये घडला, अखेर पोलिसांच्या मदतीने हे दार उघडण्यात आलं.
विरार लोकलमधील गोंधळ आणि दादागिरी नवी नाही. दादर किंवा चर्चगेटवरुन विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्येही दादागिरी पाहायला मिळते.
वसई-विरार आणि पालघर-डहाणू प्रवाशांचा संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. अनेकांना विरारमध्ये उतरायचं असल्यानं शेवटी महिलांनी चेन खेचूनच लोकल थांबवली.
लोकल डब्यात गर्दी नको म्हणून अनेक महिला या ट्रेनचं गेट बंद करुन ठेवतात, किंवा गेटवरच दाटीवाटीनं उभं राहून आतमध्ये कुणी शिरु नये, यासाठी मज्जावही करतात.