बाळासाहेबांवरील प्रेम कमी झालेले नाही - राणे

शिवसेना सोडली असली तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दलचे प्रेम कमी झालं नसल्याची कबुली उद्योगमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणेंनी दिलीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 8, 2012, 02:21 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेना सोडली असली तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दलचे प्रेम कमी झालं नसल्याची कबुली उद्योगमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणेंनी दिलीये.
`खुपते तिथे गुप्ते` या टॉक शोमध्ये नारायण राणेंनी बाळासाहेबांबद्दलच्या आपुलकीची जाहीर कबुली दिली. त्यांना भेटण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केलीये. खुपते तिथे गुप्ते मध्ये पहिल्या भागातंच राणे यांनी हजेरी लावली. यावेळी शोचा अँकर अवधूत गुप्तेनं राणेंना चांगलच बोलतं केलं. राणेंनी आपल्या मनताल्या ब-याच गोष्टी यावेळी बोलून दाखवल्या.
राणे यांनी आपल्या मनाला खुपलेल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर व्यक्त केल्या. इतकंच नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. शिवसेना सोडली असली तरीही बाळासाहेब ठाकरेंबद्दलचं प्रेम अजुनही कमी झालेलं नाही, अशी कबुलीही यावेळी राणेंनी दिली. साहेबांचे वय झाले आहे. त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही. मात्र, मी देवाकडे प्रार्थना करतो. त्यांना चांगले आणि दिर्घ आयुष्य लाभो. मनात त्यांना भेटण्याची इच्छा आहे. ते कसे रियॅक्ट होतील ते माहीत नाही.
ज्या परीस्थितून गेलो आणि आक्रमक झालो. त्यामुळे हा नारायण राणे दिसत आहे. अकरा वर्षांचा होतो त्यावेळी माझ्या आईने मला मामांकडे सोडले. त्यानंतर मी चेंबूरमधील सुभाष नगरमध्ये कॉलनीत राहीलो. तेथे काही मुलांनी मला घाबरावयाचा प्रयत्न केला. मी घाबरलो तर मला पुन्हा गावी जावे लागेल, हे मनात आले. त्यामुळे परिस्थिमुळे माझ्यातील जन्मजात असेलेली आक्रमता बाहेर आली. तेव्हापासून मी आक्रमक आहे. या आक्रमकतेच्या जोरावर इथर्यंत पोहोचलोय, हे राणेंनी सांगितले.
सर्व शिवसैनिक संपर्कात आहेत. साहेबांची विचारपूस त्यांच्याकडे करतो. त्यांच्या तब्बेतीची माहिती डे टू डे घेत असतो. जरी शिवसेनेत नसलो आणि दुरावलो असलो तरी तेव्हा त्यांच्यावर असलेले प्रेम काडीमात्र कमी झालेले नाही. हे मी रामेश्वराला स्मरूण सांगतो. मी असवस्थ असतो. उद्धव ठाकरे हॉस्पीटलमध्ये अॅडमीट होते, त्यावेळीही मी असवस्थ होतो. मला साहेबांना भेटण्याची खूप इच्छा आहे. मात्र, मी तेथे गेलो तर त्यांच्या घरातील माणसे कशी रियॅक्ट होतील? तो प्रसंग कसा असेल. याबद्दल माझ्या मनात असवस्था आहे. मनात चलबिचल आहे. त्यामुळे मी तसा निर्णय घेतलेला नाही.
साहेब आजारी आहेत. आजही आहेत. ते आजारातून बाहेर येवोत, अशी मी रामेश्वराजवळ प्रार्थना करतो. त्यांना दिर्घ आयुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. त्यांनी पुन्हा शिवसेने पूर्वी सारखं नेतृत्व करावं. शिवसैनिकांना मार्गदर्शन करावे. आज , उद्या काय निर्णय घेणार आहे, ते आज मी इथे सांगणार नाही. कदाचित जाईनही, असे राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीबाबत सांगितले.