विजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती होणार जप्त, ईडीने उचललीत पावले

नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून देशबाहेर निसटलेल्ल्या विजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती जप्त करण्यसंदर्भात आता ईडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय. 

PTI | Updated: May 12, 2016, 11:14 PM IST
विजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती होणार जप्त, ईडीने उचललीत पावले title=

मुंबई : नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून देशबाहेर निसटलेल्ल्या विजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती जप्त करण्यसंदर्भात आता ईडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय. 

गुन्हा आणि अजामीनपात्र वॉरंट

माल्ला सध्या ब्रिटनमध्ये आहे. आयडीबीआय बँकेकडून घेतलेलं कर्ज चुकीच्या कामांसाठी वापरल्याप्रकरणी माल्लायवर प्रीव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर मल्ल्याविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंटही जारी झालंय. 

स्थावर मालमत्ता होणार जप्त

शिवाय त्याचा पासपोर्टही रद्द झालंय. ब्रिटन सरकारनं माल्लायाची हकालपट्टी करून पुन्हा भारतात पाठवण्यास नकार दिलाय. पण त्याचं प्रत्यर्पण करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचा सल्लाही आपल्या सरकारला देण्यात आलाय.  त्यावर आता ईडीनं माल्लाची स्थावर मालमत्ता आणि शेअर्स असे मिळून सुमारे ९ हजार कोटी रुपयांची देशांतर्गत संपत्ती जप्त करण्यासाठी कारवाई सुरू केलीय. जप्तीच्या कारवाईआधी बँकांशींही चर्चा करण्यात येणार असल्याचं ईडीनं म्हटलंय.