मुंबई : अनेक वेळा तुमच्याकडे खराब नोट असेल तर अनेक अडचणी निर्माण होत असतात. व्यवहार करताना खराब नोटा स्वीकारल्या जात नाही. तसेच बॅंकेत बदलण्यासाठी गेले असता काहीवेळा खराब नोटा घेतल्या जात नाही. मात्र, यापुढे आता असे होणार नाही. खराब नोटा स्वीकारण्यास बॅंका नकार देऊ शकत नाही, असे आरबीआय स्पष्ट केले आहे.
एखादी खराब झालेली किंवा लिहिलेली नोट जवळ असल्यास बॅंक ही नोट घेईल का अशी चिंता वाटत असते. मात्र अशा नोट स्वीकारण्यास बॅंका नकार देऊ शकत नाही, असे आता रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे खराब झालेल्या नोटा बॅंकेतून तु्म्हाला बदलून मिळू शकतात.
खराब नोटांना बाद नोटा ठरवू नये, असं रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेकडे तक्रारी येत होत्या की, बँका खराब अथवा काही लिहिलेल्या नोटा स्वीकारण्यास मनाई करत आहेत. यावर रिझर्व्ह बँकेनं परिपत्रक काढून बँकाना या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आरबीआयने सरकारी कर्मचारी, संस्था आणि सामान्यांना नोटांवर काही न लिहिता त्यांना व्यवस्थित ठेवण्याचे आवाहन केले आहे.