मुंबईतील बीडीडी चाळींचा पुर्नविकासाचा मार्ग मोकळा

बीडीडी चाळींचा पुर्नविकास होणार आहे. एल अॅड टी या कंपनीला या पुर्नविकास कामाचं प्रोजेक्ट मिळाले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2017, 02:35 PM IST
मुंबईतील बीडीडी चाळींचा पुर्नविकासाचा मार्ग मोकळा title=

मुंबई : बीडीडी चाळींचा पुर्नविकास होणार आहे. एल अॅड टी या कंपनीला या पुर्नविकास कामाचं प्रोजेक्ट मिळाले आहे.

2903 कोटींचं पुर्नविकासाचा प्रोजेक्ट एल अँड टी या कंपनीला मिळाला आहे. पुर्नविकासात 500 चौरस फुटाचं कार्पेट एरिया फ्लॅट कुटुंबियांना मिळणार आहे. यातील 20 टॉवर कुटुंबियांसाठी असणार आहेत. तर चार रेसिडेंशियल टॉवर अन्य नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. 

बीडीडी चाळी वरळी, शिवडी, नायगाव आणि लोअर परेल भागात आहेत. तर दुसरीकडे धारावी झोपडपट्टीसाठी वारंवार टेंडर खोलूनही कोणत्याही डेवलपरने अर्ज केलेला नाही.