मुंबई : गिरणी कामगारांसह श्रमिकांची कर्मभूमी असलेल्या सुमारे 95 वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प मार्गी लागलाय. येत्या 22 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नायगाव इथं बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन होणार आहे.
नायगाव, वरळी, डिलाईल रोड आणि शिवडी परिसरात एकूण 207 बीडीडी चाळी आहेत. पहिल्या टप्प्यात नायगाव, वरळी, डिलाईल रोड इथल्या 194 बीडीडी चाळींचा पुनर्विकास होईल. या प्रकल्पांतर्गत बीडीडी चाळीत 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्यांना 500 चौरस फुटांची घरं मोफत मिळणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी अवघ्या अडीच वर्षांतच मार्गी लावलाय.