वांद्रे : मुंबईत रस्त्यांवर खड्ड्यांचा सुकाळ असून शहरातील सर्वात मोठ्या खड्डयांची स्पर्धा घेतल्यास सर्वात मोठा खड्डा पहायला मिळेल तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या बांद्रा पूर्व मतदारसंघात.
इथल्या भारतनगर इथला रस्ता गेल्या १५ वर्षांपासून केलाच गेला नाहीय. यामुळं या रस्त्यांवर अक्षरश: खड्ड्यांची रांगोळी दिसून येतंय.
इथला सर्वात मोठा खड्डा २६×१८ फूट लांबी रूंदीचा आहे. जो मुंबईतील सर्वात मोठा खड्डा आहे. बीएमसी आणि एमएमआरडीएच्या वादात हा रस्ता ना बनवला जातोय ना इथले खड्डे भरले जातायत.