मुंबई : गुजरातमध्ये 3 मार्च 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणातील पीडित बिल्कीस बानो प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय.
उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षेविरोधातली याचिका फेटाळलीय. १९ जानेवरी २००८ रोजी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने बिल्कीस बानो प्रकरणातील 20 आरोपींपैकी 13 आरोपींना दोषी ठरवलं होतं. तर इतर 7 आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने 12 दोषी आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली असून, यात 5 पोलीसांचा समावेश आहे. तर 1 आरोपीचा मृत्यु झालाय. मात्र, ज्या 7 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष सोडलं होतं त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवलंय. त्यांच्या गुन्ह्यानुसार 4 ते 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.
या सात आरोपींनी शिक्षेपेक्षा जास्त शिक्षा भोगल्याने त्यांना सोडून देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. प्रत्येकाकडून ५५ हजार रुपये दंड वसूल करुन सोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेत.