मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार का नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असतानाच भाजपनं मात्र मुंबईतल्या सगळ्या 227 जागांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.
यंदाच्या वर्षी महापालिकांच्या प्रभागांमध्ये मोठे फेरबदल झालेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक वॉर्डात भाजपच्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सध्या ठाण मांडून बसलेत. प्रत्येक वॉर्डातील भाजप पदाधिका-यांशी ते चर्चा करून आढावा घेत आहेत. ही स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी नाही, तर महापालिका निवडणुकीसाठी व्यूहरचना आखली जातेय, असं शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.