मुंबई : भाजपाने महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांसाठीचा 'महिला जाहीरनामा' मंगळवारी प्रकाशित केला. भाजपने जो विविध शहरांत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये महिलांविषयक आश्वासने आहेतच. मात्र अजून सखोल माहिती असावी म्हणून महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला असल्याचं महिला मोर्चा अध्यक्ष माधवी नाईक यांनी स्पष्ट केलं.
शहरांमध्ये महिलांच्या कामाच्या वेळा निश्चित नसणे, त्यांची सुरक्षितता या प्रमुख मुद्द्यांवर काम करणार असल्याचं जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र हा जाहीरनामा तयार करताना नाराजी नाट्य बघायला मिळाले. मुंबई महिला मोर्चाचे मत विचारात न घेतल्याबद्दल मुंबई अध्यक्षा शलाका साळवी यांनी पदाधिका-यांसह कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.