मुंबई महापालिकेनंच पोलिसांकडे दाखल केली शिवसेनेविरुद्ध तक्रार

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मुंबईत केलेली अनधिकृत जाहीरातबाजी शिवसेनेला महागात पडण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 22, 2016, 08:57 PM IST
मुंबई महापालिकेनंच पोलिसांकडे दाखल केली शिवसेनेविरुद्ध तक्रार title=

मुंबई : शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मुंबईत केलेली अनधिकृत जाहीरातबाजी शिवसेनेला महागात पडण्याची शक्यता आहे.

अनधिकृत जाहिरातबाजी करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करा, अशी तक्रार मुंबई महापालिकेनं पोलिसांकडं केलीय. 

आर मध्य विभाग महापालिका प्रशासनानं बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी त्यात करण्यात आलीय.

'झी २४ तास'कडे या तक्रारीची प्रत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे.