शिवसेनेच्या ओपन जिमला परवानगी, आता राणेंचा स्वाभिमान वडापाव स्टॉल

शिवसेनेच्या ओपन जिमला महापालिका प्रशासनानं परवानगी दिलीय. तसं पत्रच अतिरिक्त आयुक्तांनी दिलंय. मात्र आता ओपन जिम वादाला नवं वळण मिळालंय.

Updated: Jul 20, 2015, 11:18 PM IST
शिवसेनेच्या ओपन जिमला परवानगी, आता राणेंचा स्वाभिमान वडापाव स्टॉल title=

मुंबई: शिवसेनेच्या ओपन जिमला महापालिका प्रशासनानं परवानगी दिलीय. तसं पत्रच अतिरिक्त आयुक्तांनी दिलंय. मात्र आता ओपन जिम वादाला नवं वळण मिळालंय.

नितेश राणे मरीन लाइन्सवर आता स्वाभिमान वडापावचा स्टॉल लावणार आहेत. युवासेनेच्या ओपन जिमच्या १०० मीटर अंतरावर हा स्टॉल असेल, असं काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी जाहीर केलंय. 

महापालिका उद्या युवासेनेच्या जिमला परवानगीचं रितसर पत्र देणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्यामुळं स्वाभिमानीच्या वडापाव स्टॉलला सुद्धा परवानगी द्यावीस अशी मागणी स्वाभिमानी संघटना करणार आहे. त्यामुळं आता मंगळवारी युवासेना आणि स्वाभिमानी संघटनेचा नवा कोणता वाद दिसेल, हे पाहावं लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.