नवी दिल्ली: आता लवकरच बॉम्बे हायकोर्टचं नाव मुंबई हायकोर्ट होणार आहे. केंद्र सरकारनं याबाबत निर्णय घेतल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिलीय.
केंद्रीय कायदे मंत्री सदानंद गौडा यांना खासदार विनायक राऊत यांनी बॉम्बे हायकोर्टाचं नाव मुंबई हायकोर्ट करण्याबाबत पत्र लिहिलं होतं. या पत्राला प्रतिसाद देत गौडा यांनी राऊत यांना माहिती दिलीय. लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन, हे नाव बदलल्या जाईल असं त्यांनी सांगितलं.
बॉम्बे शहाराचं नाव मुंबई झाल्यापासून हायकोर्टाचंही नामकरण करण्यात यावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळं आता लवकरच बॉम्बे हायकोर्टाचं नाव मुंबई हायकोर्ट होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.