मुंबई महापालिकेचा ५८६ कोटींचा झोल; कॅगचा रिपोर्ट

मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे कॅगनं काढलेत. रस्त्याच्या कामात ५८६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 21, 2012, 07:39 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे कॅगनं काढलेत. रस्त्याच्या कामात ५८६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आलाय.
रस्त्याचं डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाची निविदा न मागवता कामं देण्यात आल्याचा ठपकाही या अहवालात ठेवण्यात आलाय. सिमेंट काँक्रिटीकरणाची ४६९ कोटींची कामे ७५५ कोटींना देण्यात आली. डांबरीकरणाची २३३ कोटी रूपयांची कामं ४०५ कोटी रूपयांना दिली गेली. त्यामुळे महापालिकेचं तब्बल ५८६ कोटी रूपयांचं नुकसान झाल्याचं कॅगनं नमूद केलंय. कोणत्याही निविदा न मागवता जुन्याच कंत्राटदारांना वाढीव किंमतीत कामे दिल्याचा ठपकाही कॅगनं ठेवलाय.
भारताचे नियंत्रक व महालेखखापरीक्षक अर्थात कॅगच्या स्थानिक संस्थांविषयी अहवालात नेमकं काय म्हटलंय...
- रस्त्यांच्या कामात ५८६ कोटी रुपयांचा महापालिकेचा फटका बसल्याचा कॅगच्या अहवालात ठपका
- रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरणाची कामे निविदा न मागवता दिली गेली
- सिमेंट काँक्रीटरणाची ४६९ कोटींचं कामे ७५५ कोटी रुपयांना दिली गेली
- डांबरीकरणाची २३३ कोटी रुपयांची कामे ४०५ कोटी रुपयांना दिली गेली
- दोन्ही मिळून ६३८ कोटी रुपयांची कामे १२२४ कोटी रुपयांना दिल्यामुळे महापालिकेचे तब्बल ५८६ कोटी रुपयांचे नुकसान
- कोणत्याही निविदा न मागवता जुन्याच कंत्राटदारांना वाढीव किंमतीत कामे दिल्याचा कॅगचा ठपका
- खड्डे बुजवण्याचे कामही निविदा न काढता, कोणतीही पारदर्शकता न ठेवता दिले गेले.

- खड्डे यांत्रिकपणे बुजवण्यासाठी घेण्यात आलेल्या यंत्रांमध्ये २.३४ कोटी रुपयांची वायफळ गुंतवणूक केली गेली
- कंत्राटदाराकडून २१ कोटी रुपयांची अतिरिक्त सुरक्षा ठेव वसुल केली गेली नाही
- सुगंधी दूध योजना बंद केल्याचे कंत्राटदाराला वेळेवर न कळवल्यामुळे टेट्रापॅकमधील सुगंधी दुधाच्या खरेदीत २.७४ कोटी रुपयांचा निष्फळ खर्च झाला