www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अनधिकृतपणे ३५ मजले बांधल्यानंतर बिल्डिंग तोडण्याच्या कारवाईची टांगती तलवार असलेल्या वरळीतल्या कॅम्पा कोला कम्पाऊंडमधल्या सात बिल्डिंगमधले १४० रहिवासी केवळ चमत्काराच्या आशेवर आहेत.
सुप्रीम कोर्टानं बिल्डींग तोडण्याची कारवाई सुरू असताना पाच महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत आज संपतेय. त्यामुळे या बिल्डींगवर गुरुवारपासून हातोडा पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं २७ फेब्रुवारीला या प्रकरणी निकाल देताना सात बिल्डिंगमधील पाच मजल्यांच्या वरचे सर्व मजले अनधिकृत असल्याचा निर्वाळा देत ते तोडण्याचे आदेश दिले होते.
रहिवाशांना हे मजले नियमित करून घेण्यासाठी कुठल्याही सरकारी यंत्रणेकडे किंवा कोर्टाकडे दाद मागता येणार नाही, असंही सुप्रीम कोर्टानं बजावलं होतं. त्यामुळं रहिवाशांच्या आशेची सर्व कवाडं बंद झाली होती. त्यानुसार आता इथल्या नागरिकांना ही बिल्डींग सोडावीच लागणार असं दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.