छगन भुजबळांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा रंगली होती. 

Updated: Dec 6, 2015, 01:05 PM IST
 छगन भुजबळांनी घेतली राज ठाकरेंची भेट  title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा रंगली होती. भुजबळ यांनी राज यांची भेट घेण्यामागे नक्की काय कारण होते याबाबत माहिती मिळालेली नाही. 

आणखी वाचा - राज-भुजबळ भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, राज यांच्या भेटीमागे कोणतीही राजकीय समीकरणे दडलेली नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. आपण केवळ राज यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी गेलो होतो असं त्यांनी सांगितलं. तसंच वैयक्तिक आयुष्यात आमची चांगली मैत्री आहे. यामुळे ही भेट घेतली बाकी काही नाही असं भुजबळ यावेळी म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.