www.24taas.com, मुंबई
मुंबईत सध्या वातावरणातील अचानक बदलामुळं अनेक मुंबईकरांचं आरोग्य बिघडलंय. विशेषत: लहान मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागलाय.
मुंबई महापालिकेच्या अनेक रुग्णालयांबरोबरच खाजगी रुग्णालयामध्ये अशा प्रकारचा त्रास होणा-या रुग्णांची संख्या वाढतंय. दिवसा सर्वाधिक तापमान आणि रात्रीच्या वेळेस घसरलेले तापमान यामध्ये मोठा फरक असल्यानं मुंबईकरांचं आरोग्य बिघडत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
सांताक्रूझमध्ये कमाल 38 तर किमान 16.2 तापमानाची नोंद झालीय. कमाल आणि किमान तापमानातील फरक निम्याहून अधिक असल्यानं आरोग्यावर वाईट परिणाम होतोय. हे टाळण्यासाठी अधिक पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.