www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चिंटू शेख गोळीबार प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळालीय. नारायण राणे तसंच प्रहार वर्तमानपत्राविरोधात केलेली अब्रु नुकसानीची याचिका शमीम उर्फ चिंटू शेख यानं मागे घेतलीय.
प्रहारमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये वापरलेल्या तडीपार, वॉटेड आणि अन्य अपशब्दांनी आपली बदनामी झाल्याचं सांगत राणे पब्लिकेशन, प्रहार आणि राणेंविरोधात शेखनं विक्रोळी मेट्रोपॉलिटन कोर्टात धाव घेतली होती. पण, आता मात्र आपण याचिका बिनशर्त मागे घेतल असल्याचं प्रतिज्ञापत्र चिंटू शेखनं दाखल केलंय. यासाठी आपल्यावर कुणाचा दबाव नसल्याचंही त्यानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.
२३ सप्टेंबर २००९ मधलं हे प्रकरण आहे. हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं होतं. सीबीआयनं नितेश राणे यांना क्लिन चिट देत क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
चिंटू शेख याच्यावर २३ सप्टेंबर, २०१० रोजी गोळीबारही करण्यात आला होता. `स्वाभिमान` संघटनेच्या कार्यालयात आपल्यावर नितेश राणे यांनी गोळीबार केल्याचा दावा शेखने त्यावेळी केला होता.
व्हिडिओ पाहा -
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.