सिडकोच्या 'त्या' इमारतींचा पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा

नवी मुंबई मधल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Updated: Apr 12, 2017, 11:22 PM IST
सिडकोच्या 'त्या' इमारतींचा पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा  title=

नवी मुंबई : नवी मुंबई मधल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

'सिडको' निर्मित धोकादायक आणि मोडकळीला आलेल्या आठ सोसायट्यांच्या पुनर्बांधणीला, सिडकोनं ना हरकत दाखला दिला आहे. त्यामुळे या इमारतींतल्या रहिवाश्यांचं दोन तपांहून अधिक काळाचं घराचं स्वप्न आता साकार होणार आहे. 

१९८० साली वाशी इथे सिडकोनं या निवासी इमारती बांधल्या होत्या. मात्र या इमारतींचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. त्यामुळे काही वर्षांमध्येच या इमारती मोडकळीला आल्या. यातल्या काही इमारतींमधल्या कुटुंबांना 'सिडको'तर्फे जुईनगरमधल्या संक्रमण शिबीरात स्थलांतरीत करण्यात आलं होतं. मात्र पुन्हा वाशीमधल्या आपल्या मूळ घरात जाण्याची या नागरिकांची प्रतिक्षा लांबतच गेली. कारण लाल फितीच्या कचाट्यात सापडलेला या इमारतींचा पुनर्बांधणी प्रकल्प, सिडकोच्या 'ना हरकत' प्रमाणपत्रासाठी आतापर्यंत रखडला होता.