बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

बीडीडी चाळीचा प्रश्न अखेर निकालात निघण्याच्या मार्गावर आहे. गुरुवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा मुख्यालयात प्रथमच भेट दिली. तेव्हा आढावा घेताना बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Updated: May 7, 2015, 09:37 PM IST
बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत title=

मुंबई : बीडीडी चाळीचा प्रश्न अखेर निकालात निघण्याच्या मार्गावर आहे. गुरुवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा मुख्यालयात प्रथमच भेट दिली. तेव्हा आढावा घेताना बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबई शहरात मोक्याच्या ठिकाणी तब्बल ९३ एकर जागेवर इंग्रजांच्या काळात बांधलेल्या बीडीडी चाळी वसल्या आहेत. एकुण २०७ चाळींमध्ये तब्बल १५ हजार पेक्षा जास्त भाडेकरु रहात आहेत. यापैंकी, बहुतांश चाळी आता ७० वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या जीर्ण झालेल्या चाळींच्या पुर्नविकासाचा प्रश्न गेली काही वर्ष चर्चेत आहेत. 

गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीमधील राजकारणामुळे हा पुनर्वसनाचा प्रश्न काही पुढे सरकला नव्हता. मात्र, भाजप-सेना सरकारने यावर जोर बैठका घेत हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने पाऊल टाकत म्हाडाच पुनर्विकास करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

बीडीडी चाळीतीलरहिवाशी संघटना मात्र म्हाडाने पुर्नविकास करु नये अशा मताच्या आहेत. तेव्हा बीडीडी पुनर्विकास आराखडा नक्की करताना रहिवाशांची मते विचारात घेऊन जनसुनावणी करत निर्णय घेणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मे महिन्याच्या अखेरीस राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण जाहीर करताना बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे धोरण जाहिर केले जाण्याच्या शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.