www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील तापमान महाबळेश्वर पेक्षाही खाली गेलं आहे. यामुळे मुंबईचं महाबळेश्वर झालंय. मुंबईचे किमान तापमान रविवारी १३.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आलं. मात्र महाबळेश्वरचं किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअस एवढं होतं.
उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. मुंबईचं किमान तापमान शनिवारी १३.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
मुंबईकरांना शनिवारी आणि रविवारी सकाळी स्वेटरचा आधार घ्यावा लागला. कोकणच्या तापमानातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं हवामाना खात्यानं म्हटलं आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात सरासरी तापमानापेक्षा किमान तापमानात थोडीशी घट झाली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.