वांद्र्यातील 'मातोश्री'च्या दाराबाहेर डेंग्यूची टकटक

मुंबईकरांच्या रोषाची धनी ठरलेल्या शिवसेनेला सध्या पावसानं दडी मारल्यानं थोडा दिलासा मिळाला होता. पण आणखी एका आव्हानानं हळूहळू डोकं वर काढण्यास सुरवात केल्यानं, शिवसेनेच्या डोक्याचा ताप वाढण्याची चिन्ह आहे. कारण वांद्र्याच्या साहित्य सहवास इथं नुकत्याच झालेल्या दमदार पावसानंतर इथे एडेस ईजिप्ती डासांची पैदास सुरु झालीय. 

Updated: Jul 3, 2015, 12:23 PM IST
वांद्र्यातील 'मातोश्री'च्या दाराबाहेर डेंग्यूची टकटक title=

मुंबई : मुंबईकरांच्या रोषाची धनी ठरलेल्या शिवसेनेला सध्या पावसानं दडी मारल्यानं थोडा दिलासा मिळाला होता. पण आणखी एका आव्हानानं हळूहळू डोकं वर काढण्यास सुरवात केल्यानं, शिवसेनेच्या डोक्याचा ताप वाढण्याची चिन्ह आहे. कारण वांद्र्याच्या साहित्य सहवास इथं नुकत्याच झालेल्या दमदार पावसानंतर इथे एडेस ईजिप्ती डासांची पैदास सुरु झालीय. 

डेंग्यूचा फटका वसाहतीतल्या रहिवाशांना बसलाय. आनंदवन इमारतीत राहाणाऱ्या हर्षे कुटुंबातल्या तिघांना याची लागण झालीय. सहित्य सहवासासाठी हा अनुभव नवा नाही. गेल्यावेळीही साहित्यिकांच्या वसाहतीला डेंग्यूचा विळखा पडला होता. पण आश्चर्य याच गोष्टीचं आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या वसाहतीला या अनुभवाला वारंवार सामोरं जावं लागतंय. 

महापालिकाही आपलं कर्तव्य बजावण्यात कमी पडत असल्याची खंत रहिवासी व्यक्त करत आहेत. डेंग्यूचा फैलाव मुंबईत झाल्यास वांद्रे कारणीभूत ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी आता शिवसेना कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.