मुंबई : महिला तसेच मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण काही थांबण्याचे नाव घेतल नाही. नशेत असलेल्या एका व्यक्ताने जबरदस्ती एका मुलीच्या घरात घुसून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंबईत समोर आलीय.
मुंबईतल्या मालवणी परिसरात ही घटना घडलीये. मिळालेल्या माहितीनुसार, नशेत असलेला हा आरोपी एका २२ वर्षीय मुलीच्या घरात जबरदस्ती घुसला आणि तिची छेडछाड करु लागला.
सीएनएन-आयबीएनने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला त्या मुलीच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि पाणी मागितले. पाणी मागण्याच्या बहाण्याने तो घरात आला आणि त्याने छेडछाड करण्यात सुरुवात केली. मात्र पोलीस तेथे पोहोचण्याच्या आधीच त्या माणसाने तेथून पळ काढला. २५ डिसेंबर रोजी हा सर्व प्रकार घडल्याचे सांगण्यात येतेय.