मुंबई : तुमच्यासाठी एक मह्त्वाची बातमी. डासांमुळं होणा-या डेंग्यू या आजारानं यंदा नेहमीपेक्षा लवकर एंट्री मारली आहे.
दररोज डेंग्यू आजारानं त्रस्त २-३ रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होत आहेत. सायन हॉस्पिटलच्या तीन रेसिंडेट डॉक्टर्सनाही डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झालेय.
गेल्या दोन आठवड्यापासून या डॉक्टर्सवर उपचार सुरु आहेत. आता या तिघांचीही प्रकृती सुधारत असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय. गेल्या वर्षी डेंग्यूनं १५ जणांचा बळी घेतला होता तर सुमारे साडेआठशे नागरिकांना डेंग्यूची लागण झाली होती.
डेंग्यू ठराविक मौसमात होणार आजार नसून तो कधीही होऊ शकतो हे यामुळं सिद्ध झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. मान्सूनपूर्व पावसामुळं डेंग्यू लवकर आल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. त्यामुळं ताप, अंगदुखी आणि पोटदुखीच्या आजाराकडे दुर्लक्ष करु नका, असं आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.