मुंबई : मुंबईत एका तीन वर्षांच्या चिमुरडीचा थंडीमुळं मृत्यू झालाय. परेलच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या बाहेर फूटपाथवर ही दुर्दैवी घटना घडलीय.
टाटा रुग्णालयात कॅन्सरवर उपचार करण्यासाठी देशभरातून रुग्ण येत असतात. उत्तर प्रदेशातल्या कानपूरहून अस्लम शहा हा कॅन्सरग्रस्त रुग्ण हॉस्पिटलसमोरच्या फूटपाथवर गेल्या 5 महिन्यांपासून राहत होता. त्याच्यासोबत त्याची 3 वर्षांची सोनम नावाची मुलगीदेखील होती.
गेल्या तीन दिवसांपासून तिला थंडीचा आणि न्यूमोनियाचा त्रास होत होता. केईएम रुग्णालयातून तिच्यासाठी औषधंही आणली होती. मात्र काल दुपारी चार वाजता तिचा मृत्यू झाला.