मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून लैंगिक शिक्षण दिले जाणार आहे. ९ आणि १० वीच्या विद्यार्थ्यांना हे लैंगिक शिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती पालिसा सूत्रांकडून देण्यात आली.
यासंदर्भात शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिक्षण समितीत ठरावाबाबत सूचना मांडली होती. त्याला प्रशासनाने मान्यता दिली आहे. लैंगिक शिक्षणासाठी ९ वी आणि १० वीच्या मुला-मुलींची वेगवेगळी सत्र घेतली जाणार आहेत.
किशोरवयात मुलांमुलींमध्ये येणारे शारीरिक आणि मानसिक बदल, मासिक पाळी, प्रसुती, प्रजनन संस्था तसंच कुटुंबनियोजन या विषयांची सखोल माहिती दिली जाणार आहे.
जीवन कौशल्य सत्रात सकारात्मक विचार, निर्णयक्षमता, नाही म्हणण्याचे कौशल्य, सुसंवाद कसा साधावा हे शिकवले जाईल. किशोरवयीन मुला मुलींचे लैंगिक शोषण कसे होवू शकते आणि ते कशा प्रकारे टाळता येईल. याचे धडे दिले जाणार आहेत. जर असा प्रकार घडल्यास मदतीसाठी कुठे संपर्क करायचा. हेही सांगितले जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.