मुंबई: मुंबईतल्या ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही शेअर टॅक्सीनं रोज प्रवास करत असाल तर ड्रायव्हर शेजारची सीट हक्कानं मागा. कारण आजपासून ड्रायव्हर शेजारची सीट ही महिलांसाठी राखीव आहे.
यामुळे टॅक्सीच्या मागच्या सीटवर तुम्हाला आता अंग चोरून बसण्याची गरज नाही. आरामात पुढच्या सीटवर बसा. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज संध्याकाळी या सुविधेची सुरूवात केली. सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर महिला प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय.
खरं म्हणजे महिला प्रवाशांसाठी याआधीच उपनगरीय रेल्वे गाडीत राखीव डबे आहेत. बेस्ट बसमध्ये राखीव सीट्स आहेत. मात्र टॅक्सीत ही सुविधा नव्हती. आता आजपासून ही सुविधाही सुरू झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.