मुंबई: तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मौसमाला सुरुवात होईल. फेब्रुवारीपर्यंत लग्नाचे बार उडतील. त्यामुळे मुहूर्त शोधण्यासाठी वधुपित्यांची लगबग सुरू झाली आहे. मुहूर्त सापडल्यानंतर बस्ता बांधण्यासाठी आणि सोनं खरेदीसाठी झुंबड उडेल. मात्र, लग्नसराईसाठी दणक्यात सोने खरेदी करणार्या वधुपक्षासाठी मोठी खुशखबर आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली असून वधुपित्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव घसरल्यामुळे सोने ६०० रुपयांनी उतरून २६ हजार ५०० प्रति तोळा इतके झाले आहे.
गेल्या महिनाभरात सोनं पहिल्यांदाच इतक्या खाली आलं आहे. ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यानं वधुपित्यांच्या तोंडाला फेस आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर मजबूत झाल्यामुळं सोन्याच्या मागणीत घट झाली, परिणामी सोन्याच्या दरात घट झाली आहे. ४ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह असून त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत लग्नसराईचा मौसम असणार आहे.
त्यासाठी सोने उतरण्याची वाट बघणार्या वधुपक्षाला आता दणक्यात सोनं खरेदी करता येणार आहे. मागील दोन दिवसांत सोन्याच्या दरात १ हजार तर चांदीच्या दरात २ हजार २५० रुपयांची घट झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात एक हजार २०० औंस इतकी घट झाली आहे.
मागणी वाढणार
सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं हिंदुस्थानात सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, सोन्याच्या भावात आणखी घसरण होण्याची शक्यता असून ही बाब हिंदुस्थानातील तमाम सराफा व्यापार्यांसाठी आनंदाची असल्याचं मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.