मुंबई: छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करणा-या एसीबीला मुंबई हायकोर्टानं जोरदार दणका दिला.
एसीबीमार्फत चौकशी सुरू असलेल्या ९ पैकी ४ प्रकरणांमध्ये काहीही गैरव्यवहार आढळला नाही. त्यामुळं चौकशी बंद करत असल्याची माहिती एसीबीनं कोर्टाला दिली. मात्र ही प्रकरणं बंद न करता, अधिक चौकशी करावी, असं कोर्टानं एसीबीला खडसावलं.
तसंच येत्या १४ ऑगस्ट रोजी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले.
कोणत्या प्रकरणात भुजबळ कुटुंबियांची चौकशी बंद करण्याची विनंती एसीबीनं कोर्टाला केली होती, ते पाहूयात...
- एकूण नऊ आरोपांपैकी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या पुनर्बांधणीचं काम आणि कालिना इथली जमीन बळकावणे यासंबंधी 'एसीबी'नं एफआयआर नोंदविले आहेत.
- याशिवाय भुजबळ कुटुंबीयांच्या कंपनीनं प्रस्तावित केलल्या 'हेक्स वर्ल्ड' या गृहनिर्माण प्रकल्पाच्या संदर्भात नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
- त्यात सुमारे दोन हजार लोकांकडून घरांसाठी ४४ कोटी रुपये घेऊनही त्यांना घरं न दिल्याचा आरोप आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.