www.24taas.com झी मीडिया, मुंबई
मुंबईबरोबरच किनाऱ्यालगत असणाऱ्या कोकण भागात आणि महाराष्ट्रातील उत्तर भागात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे. ओरिसाच्या किनारपट्टीवरील मान्सूनचा दबाव वाढल्यामुळे आणि तो पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे हवामानात हा बदल झाला आहे.
मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात येथे देखील येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन-तीन दिवसात विदर्भ आणि तसेच जवळपासच्या क्षेत्रात मुसळधार पाऊसने १०७ लोकांचा बळी घेतला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने मच्छीमारांना अरब समुद्रात जाण्यास सक्ती केली असून राज्यातल्या सर्व बेटांवर अशी सूचना दिली गेली आहे.
बृहनमुंबई महानगरपालिका, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सर्व आपत्ती एजन्सी आणि बाकीच्या महत्त्वाच्या विभागात अलर्ट जाहीर केला आहे. पुढे येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आधिकारी पूर्णपणे सज्ज असतील, असे सांगितले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.