मुंबई आणि उपनगरांत धो-धो पाऊस

मुंबई आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. दादर, परळ आणि सीएसटीतही जोरदार पाऊस सुरू आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस आणि जेजे फ्लाय ओव्हरवर वाहनांची कोंडी झाली आहे. 

Updated: Jul 31, 2014, 10:27 PM IST
मुंबई आणि उपनगरांत धो-धो पाऊस title=

मुंबई : मुंबई आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. दादर, परळ आणि सीएसटीतही जोरदार पाऊस सुरू आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस आणि जेजे फ्लाय ओव्हरवर वाहनांची कोंडी झाली आहे. 
 

UPDATE@08.15

मुंबईत पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने, वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता, मात्र अधून मधून पावसाच्या सरी येणं सुरूच

UPDATE@06.51
पावसामुळे मेट्रोचीही गती मंदावलीय. वसई, विरार भागातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरू आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि आसनगावमध्येही पाऊस सुरू आहे.
UPDATE@06.48
सेन्ट्ल रेल्वेची वाहतूक 30 ते 40 मिनिटं उशीराने सुरू असल्याने प्लॅटफॉर्मवर लोकांची गर्दी झाली आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या लोकलची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरू आहे. पेडररोड - हाजीअली मार्गावरही वाहतुकीला खोळंबा झाला आहे. 
UPDATE@06.40
भिवंडीच्या काही भागात पाणी साचलंय. कसारा घाटातला नवा रस्ता खचला आहे. नाशिकहून मुंबईकडे येणारी वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. भिवंडीच्या काही भागात पाणी साचलंय. तर अंधेरी एमआयडीसीतही पाणी साचलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.