www.24taas.com, मुंबई
मुंबईत १५ ऑगस्ट आणि सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिलाय..सणानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येतात..दहशतवाद्यांकडून त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता नाकारताय येत नाही...या पार्श्वभूमीवर हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..
गणेशोत्सव ... नवरात्रौत्सव आणि दही हांडी हे सण येवू घातले असून या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय... सणांच्या निमित्ताने मुंबईतल्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी होते... दहशतवाद्यांकडून त्याचाच गैरफ़ायदा घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही...
मुंबईत ७४१ ठिकाणं पोलिसांनी संवेदनशील म्हणून घोषित केली असून त्यातील १२८ ठिकाणं दक्षिण मुंबईत आहेत. सर्वच वस्तूंचं होलसेल मार्केट या भागात असल्याने या परिरात १०६ पेक्षा जास्त ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आलेत.सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागातील सर्व धर्मांच्या संघटनांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी रेल्वे पोलिसांनाही सतर्क राहण्यास सांगितलं असून शहरात ठिकठिकाणी चार कुख्यात संशयीत दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यात आलेत.
उत्सवाचं मंगलमय वातावरणाला कुठे गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलीसांनी दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी मुंबई पोलीस सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाडेकरुंची तपासणी करतायेत. मोटर सायकल आणि सायकल विक्रीच्या व्यवहारांची नोंद ही पोलीस ठाण्यात देण्याची सक्ती करण्यात आलीये.
मुंबईतील विविध सामाजीक संस्था आणि संघटनांची मदत घेतली जात असून सणासुदिच्या काळात सर्वसामान्य जनतेनंही सतर्कता बाळगावी असं आव्हान मुंबई पोलिसांकडून करण्यात आलंय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.