www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
महामार्गाजवळील (हायवे लगत) असलेले बार आणि दारूची दुकानं बंद होणार आहेत. उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली.
ड्रंक ऍण्ड ड्राईव्हच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालयानं राज्य सरकारला निर्देश दिलेत. त्यानुसार हायवेलगत असलेल्या बार आणि दारूच्या दुकानांचे परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना देण्यात आल्याची माहिती नाईक यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
राज्यात हायवेलगत असलेले सुमारे साडेचार हजार बार आणि दारूची दुकानं यामुळे बंद होणार आहेत. दरम्यान, डान्सबारवरून सरकारची नाचक्की झाली असताना पुन्हा बार आणि दारू दुकानांवर बंदीचा बडगा उचललाय.
राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील डान्सबारवर २००६मध्ये बंदी घातली होती. आता ही बंदी उठविण्यात यावी आणि डान्स बार सुरू करण्यात यावेत, अशा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने पुन्हा डान्सबार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईत छमछम सुरूच राहणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.