मुंबई : मुंबईत पुन्हा हिट अँड रनचं प्रकरण उघडकीस आलंय. मोहम्मद अली रोडवर एका भरधाव मर्सिडीज कारनं फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडलंय.
यात चार महीला आणि दोन छोट्या मुलींचा समावेश आहे.. या दुर्घटनेनंतर गाडीचा चालक फरार झाला असून सर्व जखमींना उपचारासाठी जे.जे. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
या दुर्घटनेपूर्वी या वाहन चालकान अन्य दोन गाड्यांनाही ठोकलं होतं.. गाडीचा चालक हा महापालिकेचा कंत्राटदार असल्याचं बोललं जातंय. पोलीस त्याचा शोध घेत असून दुर्घटनेविषयी अधिक माहिती गोळा करण्यासाठी सीसीटीव्ही फूटेची मदत घेतली जाणार आहे.